फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - दिव्या देशमुखचे दमदार पुनरागमन, हम्पीचा सलग दुसरा विजय

IM दिव्या देशमुख हिने FIDE पुणे ग्रँड प्रिक्सच्या चौथ्या फेरीत IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया) हिच्यावर मात करत विजयी पुनरागमन केले. ही लढत मेजर पीस एंडगेममध्ये गेली, जिथे दिव्याला तिच्या प्रतिस्पर्धीच्या चुकांची वाट पाहावी लागली. GM कोनेरू हम्पी हिने सलग दुसऱ्या फेरीत विजय मिळवत IM पोलिना शुवालोवा हिचा पराभव केला. हम्पी आणि दिव्या दोघींचेही आता ४ पैकी ३ गुण झाले आहेत. त्या दोघी GM झू जायनर (चीन) हिच्या मागे अर्ध्या गुणाने आहेत. झू जायनरने IM अलीना काशलिंस्काया (पोलेण्ड) हिला पराभूत करत आघाडी कायम ठेवली आहे. GM हरिका द्रोणावल्ली आणि GM आर वैशाली यांच्यातील सामन्यात बरोबरी झाली. IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गेरिया) हिने या स्पर्धेतील आपला पहिला विजय IM बाथखुयाग मंगुंतुल (मंगोलिया) हिच्यावर नोंदवला. पाचवी फेरी आज दुपारी ३ वाजता (IST) सुरू होणार आहे. फोटो : अनमोल भार्गव